आई वडीलांचं आपल्या आयुष्यात खूप योगदान असल्याची समज मला आयुष्यात फार उशिरा आली ... जवळ जवळ वयाची पन्नाशी गाठल्यावर ... साधारणपणे मुलीच्या बाबतीत असं होत नाही ... सर्वसाधारणपणे मुली जास्त संवेदनशील असतात ... आणि आईवडिलांच्याच काय, परीवारातल्या सगळ्यांच्या योगदानाची आठवण ठेवतात ... त्यांना परतफेड करण्याची सुद्धा इच्छा असते ... आणि ती त्या प्रत्यक्षातही आणतात ... पण मी त्याला अपवाद आहे ... ही फार अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही ... अर्थातच ... आणि त्याच्या वर माझी आईपण शिक्कामोर्तब करते, की तू मुलगी नाही मुलगाच आहेस आमचा ... आईचे हे म्हणणे, भारतीय समाजातली पुरुषप्रधानता लक्षात घेता लोकांना कौतुक वाटण्याची शक्यता आहे ... पण तसा गैरसमज करून घेतला नाही तर बरं, कारण माझी आई हे बरेचसे रागावून म्हणते ...कौतुकाने नाही ... मी माझ्या वडिलांवर गेली आहे, असेही तिचे म्हणणे आहे ... पण परत कौतुक नाही, की वडिलांसारखी Engineer आहे ... फक्त वडिलांसारखी संतापते, असाच भाग आहे ... असो ... हे मी आईवर मजेशीर कौटुंबिक टीका म्हणून सांगितले ... त्यात फार काळजीचे कारण नाही ... पण विचार आला की माझ्या इथपर्यंतच्या आ...
Comments
Post a Comment