आई बाबा

आई वडीलांचं आपल्या आयुष्यात खूप योगदान असल्याची समज मला आयुष्यात फार उशिरा आली ... जवळ जवळ वयाची पन्नाशी गाठल्यावर ... साधारणपणे मुलीच्या बाबतीत असं होत नाही ... सर्वसाधारणपणे मुली जास्त संवेदनशील असतात ... आणि आईवडिलांच्याच काय, परीवारातल्या सगळ्यांच्या योगदानाची आठवण ठेवतात ... त्यांना परतफेड करण्याची सुद्धा इच्छा असते ... आणि ती त्या प्रत्यक्षातही आणतात ... पण मी त्याला अपवाद आहे ... ही फार अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही ... अर्थातच ... आणि त्याच्या वर माझी आईपण शिक्कामोर्तब करते, की तू मुलगी नाही मुलगाच आहेस आमचा ... आईचे हे म्हणणे, भारतीय समाजातली पुरुषप्रधानता लक्षात घेता लोकांना कौतुक वाटण्याची शक्यता आहे ... पण तसा गैरसमज करून घेतला नाही तर बरं, कारण माझी आई हे बरेचसे रागावून म्हणते ...कौतुकाने नाही ... मी माझ्या वडिलांवर गेली आहे, असेही तिचे म्हणणे आहे ... पण परत कौतुक नाही, की वडिलांसारखी Engineer आहे ... फक्त वडिलांसारखी संतापते, असाच भाग आहे ... असो ... हे मी आईवर मजेशीर कौटुंबिक टीका म्हणून सांगितले ... त्यात फार काळजीचे कारण नाही ... पण विचार आला की माझ्या इथपर्यंतच्या आयुष्याचा जमाखर्च बघावा ... कारण आतापर्यंत स्वतःची career आणि  स्वतःच्या family life ला आवरता आवरता दमछाक झाली ... म्हणून आता निवांत पणे लिहायला घेतलं आहे ... आम्ही तिघी मुलीच आमच्या आईवडिलांना ... मुलगा हवा होता त्यांना सुद्धा त्या काळातल्या रीतींप्रमाणे ... पण नाही झाला ... आईवर राग होता माझ्या तिसऱ्या बहिणीच्या वेळी ... तिला hospital मध्ये बघायला गेले नाहीत ... जन्म झाला तेव्हा ... पण नंतर त्याच बहिणीवर सगळ्यात जास्त जीव ... तेवढेच वडिलांच्या बाबतीत gender discrimination म्हणता येईल ... त्यानंतर तिघींनाही जितके चांगले शिक्षण देता येईल तेवढे दिले ... तिघींनाही स्वतःच्या पायावर उभे राहता येऊ शकेल तिथपर्यंत आईवडील दोघांनी सर्वतोपरी मदत केली ... वडील आठवी पर्यंत घरी गणिताची उजळणी घ्यायचे ... ईंग्लिशच्या spellings चे पाठांतर रोज करवून घ्यायचे ... आईची स्वतः ची शिस्त होती ... सकाळी उठवणे, वेळेवर डबा तयार करणे, काही शाळेसाठी जरुरी वस्तू आणून ठेवणे ... वगैरे वगैरे ... परीक्षा झाली .. result चांगला लागला की एक cadbury ठरलेली असायची ... दर वर्षाला एक cadbury ... आम्हाला ते मोठे बक्षीस होते वडिलांकडून ... असे नाही की माझे वडील वर्षात जास्त cadburies देऊ शकत नव्हते ... ती ऐपत असेल ... पण प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते ... चांगल्या result ची पण आणि बक्षीस म्हणून वडिलांकडून मिळालेल्या cadbury ची पण ... चांगल्या गोष्टींची किंमत करायला शिकवलं ... आई वडिलांमध्ये आपापले मतभेद होते ... थोडी काळजी वाटायची त्यांची आणि आम्हा मुलींचीही ...पण हा rough patch प्रत्येक घरात असावा ... त्यातून बाहेर आलं घर ... घरी सगळे संस्कार "कृतीतून" मिळाले ... तिघी मुली असून आईबाबांनी कधी equality वर प्रवचन न देता तिघींना equal संधी दिली ... शिक्षणाची ... अंथरूण पाहून पाय पसरावे, म्हणजे आधुनिक भाषेत ज्याला planning आणि budgetting म्हणतात, ती आईची शिकवण ... घरी सुट्यांमधे पाहुणे असायचे ... परीस्थिती एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाची होती ...  शिक्षण आणि मग नोकरी अशी विचारसरणी ... इतर चारचौघं मराठी घरांप्रमाणेचं ... 'व्यवसाय' वगैरे चे बाळकडू नाही मिळाले ... पण खूप चांगले संस्कार मिळाले ... वडील गायचे चांगले ... filmi गाणेच ... मोहम्मद रफी किंवा मुकेश ... पण चांगले गायचे ... मी लहान होते ... २-३ वर्षाची असेन ... बाबा गात असताना कुणी विचारले, कोण गातय ? तर मी म्हणायचे मोहम्मद रफी ... त्यांना खूप आनंद होता त्यात ... छोट्या छोट्या गोष्टीत आनंद होता ... वडिलांच्या स्वतःच्या घरी त्यांच्या लहानपणी पैशाची कमतरता होती ... वडिलांनी स्वतः दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिकवून, पैसे मिळवून, त्यातून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले ... आम्हाला मात्र वडिलांनी अभ्यासाच्या साधनात काही कमी पडू दिले नाही ... पण मुलांनी मुलांचा अभ्यास करावा आणि खेळावे किंवा इतर activities कराव्यात अशा मताचे ते आहेत ... मोठ्या माणसांमध्ये जास्त लक्ष घातले तर रागवायचे ... तो एक शिस्तीचा भाग होता ... एकदा घरी थोडे office चे उरलेले drawings करत होते .. मी विचारले "बाबा, काय करता आहात?" ... ते रागावले "तुला काय करायचे त्यात ?" ... त्यानंतर मी वडिलांना त्यांच्या कामाबद्दल एकही प्रश्न विचारला नाही ... "Mind your own business", हे फार लहानपणी शिकले मी ... चौथीत होते ... माझ्या वडिलांना परीस्थितीमुळे गाणं शिकणं शक्य नव्हतं ... पण त्यांना एकंदरीत वाटत असावं, की गाणं शिकल्या तर मुली कदाचित अभ्यासाकडे दुर्लक्ष करतील ... म्हणून मला वाटते कि घरात गाण्याचे महत्व असूनसुद्धा आम्ही मुली गाणं शिकलो नाही ... औपचारीक रीतीने ... वडिलांना गाण्याची आणि movies ची पण आवड आणि नावडही तितकीच तीव्र ...नावडती movie असली की ते अक्षरशः त्रासून जातात ... channel change करायचा अक्षरशः हुकूम सुटतो ... आम्ही जेव्हा मोठे झालो, तेव्हा नवऱ्याच्या आणि स्वतःच्या आवडीचे movies आणि गाणी बघायला लागलो ... पण तोपर्यंत remote control बाबांच्या हाती होता ... कारण नवीन सगळ्या movies बाबांना मानवणाऱ्या नव्हत्या ... बाबांची सर्वप्रथम आवडती गोष्ट म्हणजे movie मधली गाणी ... गाण्यासाठी movie ... दुसऱ्या क्रमांकावर नायक व त्याची भूमिका ... त्यानंतर मग story वगैरे सगळं ... सरळ हिशोब ... जास्त करून हिंदी movies आणि गाणी ... आता मराठी घरात हिंदी गाणी जेव्हा वाजायची, तेव्हा आमचे मराठी नातेवाईक थोडे अस्वस्थ व्हायचे ... त्याचे कारण आईवडील मध्यप्रदेशातील होते आणि नातेवाईक संपूर्ण मुंबईकर ... शंभर टक्के महाराष्ट्रीयन ... वडिलांना वाटत असे, मी चांगली जुनी गाणी लावली आहेत, तर ते लोक आनंदात असतील ... वडिलांना हे माहीत नव्हते, कि त्या काळी दक्षिण भारतीय लोकांसारखा मराठी माणूस पण हिंदी चा तिरस्कार करत असे ... हिंदीचा संबंध बहुतांशी उर्दूशी किंवा स्पष्ट सांगायचे तर इस्लामी संस्कृतीशी जोडला जात असे ... माझ्या लक्षात आमच्या नातेवाईकांची अस्वस्थता यायची ... पण कदाचित वडिलांना समजले नाही, कि समजल्यावर सुद्धा काय करावं ते कळलं नाही, ते मला माहित नाही ... कारण माझे वडील गप्पा मारणाऱ्या लोकांपैकी नव्हते ... म्हणून नातेवाईक जमल्यावर गाण्याशिवाय दुसरे काही करणार काय, हा त्यांच्यापुढे  मोठा प्रश्न होता ... म्हणून ते गाणी record करून पाहुण्यांना ऐकवायचे ...आम्ही मुली आणि बायको तर होतोच ऐकणाऱ्यांमधे .... असो ... माझ्यासाठी movie निवडण्याचा मार्ग म्हणजे newspaper मधली story आणि reviews ... अर्थात सगळेच reviews मान्य होत नाहीत, पण story कळते ... story बहीण किंवा मैत्रीणीकडून कळली तरी चालते ...त्यांचा review तर सगळ्यात उत्तम ... कारण निवडीचा साधारण अंदाज एक असतो ... असा आमच्या घरांमध्ये गाण्यांचा आणि movies चा प्रवास चालत असतो ... अलिकडे, जर माहित असलेल्या movies परत बघायच्या असतील, तर त्या director च्या नावावरुन बघते ... director मुळे एखाद्या गोष्टी कडे किंवा घटनेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कळतो ... director ची आणि आपली मते कुठेतरी match होतात ... movie आपली वाटते ... त्या director च्या नवीन movies कुठल्या आहेत हे समजतं ... असो ... विषयांतर झालं ... आईचा आनंद तिच्या मुलींमध्ये किंवा माहेरच्या पद्धतीने खाण्याचे पदार्थ बनवण्यात आहे आणि होता ... आम्ही आणि आमच्या नवऱ्यांमध्ये जेव्हा मतभेद होतात, तेव्हा त्याचे कारण आम्ही मुलीच आहोत, यावर आई ठाम असते ... ते आईचं gender discrimination आहे ... जावई म्हणजे "राजस सुकुमार, मदनाचा पुतळा" आहे तिच्या दृष्टीने ... त्यावरून तिचे व माझ्या मधल्या बहिणीचे वाद होतात ... मी आईला त्या बाबतीत सुधारायला जात नाही ... काही गोष्टींना उपाय नसतो ... सोडूनि द्यावे ... अशा मताची मी आहे ... असो ... वडिलांचं गाणं किंवा गुणगुणणंही आता बंद झालं ... वडिलांनी शिकवलं की आपले विचार पाहिजे, आपली खास निवड पाहिजे ... प्रत्येक बाबतीत ... गाणी निवडताना सुद्धा ... गाण्याच्या किंवा movies च्या बाबतीत आपलं मत देताना सुद्धा ...आपले विचार पाहिजे ... इतरांच्या मताशी प्रत्येक वेळी सहमत होऊन चालत नाही ... आईवडिलांच्या योगदानाची परतफेड करणं फार कठीण असतं ... आम्ही मुलींनी आईवडीलांना आमच्या घराजवळ राहायला बोलविले ... थोडी वर्ष ते नको म्हणत होते, पण गेले ३ वर्षे आमच्या जवळ राहतात ... आम्हाला खूप आनंद आहे त्यात ...


Comments

Popular posts from this blog

Robotics Ideas

Lego Mindstorm - Experiences

My Life As a HouseWife - Part 2