मराठी माणूस
तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आपल्याकडे संहिता चांगल्या आहेत. म्हणजे आपल्याकडे कल्पना आणि मूल्यं चांगली आहेत. मराठी माणसाला मराठी आणि हिंदी तर येतच पण त्याबरोबर हेही सत्य आहे की बहुतांशी शहरी मराठी माणसाला ईंग्लिश पण येतं किंवा कमीतकमी समजतं तरी. मराठी सिनेमा हिंदी मध्ये डब करुन उत्तर भारतात मार्केट करता येईल आणि ईंग्लिश मध्ये डब करून दक्षिण भारतात मार्केट करता येईल. मराठी माणसाला पूर्ण भारत खुला आहे. मराठी माणसाचं कौतुक करावं तितकं कमी आहे की त्यांनी अजूनही आपल्या परंपरा आणि मुल्यांना सांभाळून ठेवलं आहे आणि तरी त्याने आधुनिक समाजातला बदलही अंगिकारला आहे. दक्षिण भारत अतिशय जुनी मुल्ये अजूनही जोपासतो (दक्षिण भारतीय Loyal नाहीत, ते Stubborn आहेत. भारतीय नेत्यांनी कितीतरी प्रयत्न केले की त्यांनी हिंदी शिकावे, नेते हे म्हणत नाहीत कि तुम्ही उर्दु शिका. पण ते नाही शिकत. ते ईंग्लिश शिकतात, पण हिंदी नाही शिकत. मला वाटतं कि त्यांना हिंदी आणि उर्दुतला फरक अजून कळत नाही.) आणि उत्तर भारत सगळी भारतीय मूल्ये धाब्यावर बसवतो. मराठी माणूस आपल्या तार्किक बुद्धीने दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात एक सुवर्ण मध्य साधतो. मराठी माणूस अतिशय समजूतदार आणि हुशार आहे. त्याला फक्त कुणीतरी चांगलं समजावून सांगण्याची गरज आहे. मराठी माणूस आडमुठा नाही, ही फार चांगली गोष्ट आहे. माझ्या मते मराठी माणूस पैशापेक्षा परंपरा, मूल्य आणि बहुश्र्रुततेला जास्त महत्व देतो आणि ते चांगले आहे. पैसा ही मराठी माणसाने दुय्यम गोष्ट मानली. म्हणून मला वाटते पैसाही त्याच्याकडे आकर्षित झाला नाही. आपण ज्या गोष्टी मध्ये invest करतो तीच गोष्ट आपल्याला मिळते. मला नाही वाटत मराठी माणूस पिक्चर चं budget बघून तिकीट काढतो. त्याला चांगले आणि वाईट याची चांगली पारख आहे. थोड्या फार प्रमाणात जे मराठी माणसाला लागू पडतं तेच बंगाली माणसालाही लागू पडतं.
Comments
Post a Comment